Posts

प्रकाशदूत

Image
सौंदाणे शिवारात वाहनासह ९४ लाखांचे मद्य जप्त प्रकाशदूत मालेगाव / उमराणे : तालुक्यातील  सौंदाणे शिवारातील मुंबई- आग्रा महामार्गावरील हॉटेल तुळजाई समोर मालेगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत वाहन, मद्यासह ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मद्यसाठा घेणारा, पुरवठादार व वाहनमालक यांच्या विरोधात व इतर अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. मालेगाव विभाग राज्य उत्पादन  शुल्कपथकाला मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.६) रोजी सदर कारवाई करण्यात आली. पथकाने सापळा रचून वाहन तपासणी करताना आयशर कंपनीचे सहाचाकी मालवाहतुक वाहन क्रमांक (जीजे ३५ टी ३५३८) अडवले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवा राज्यात निर्मिती व विक्री करीता असलेला परराज्यातील मद्याचा साठा मिळून आला. या कारवाईत पथकाने वाहनासह ९०० बॉक्स विदेशी मद्य व बियरचा साठा असा एकूण ९४ लाख २४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहनचालक कमलेश भारमल राम यास अटक करण्यात आली असून मद्यसाठा घेणारा, पुरवठादार व जप्त वाहनमालक यांचे विरोधात व इतर अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आ

प्रकाशदूत

Image
पालकमंत्री साहेब तुम्ही खरचं चुकलात हिरे समर्थकांचा आक्रोश प्रकाशदूत मालेगाव : शहर व तालुक्यातील गावांगावात ज्ञानाची, विकासाची गंगा पोहचवण्याबरोबरच सर्व जाती धर्मायांच्या मुलांच्या शिक्षणासह रोजीरोटीचा प्रश्न सोडविणाऱ्या हिरे कुटूंबियांची जिल्हयाचे पालकमंत्री दादा भुसे हे राजकिय आकस व द्वेष भावनेतून बदनाम करीत आहेत. खोट्या गुन्ह्यात माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांचे नाव गोवून पालकमंत्र्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून पालकमंत्री साहेब, तुम्ही खरच चुकलात अशा शब्दात खाकुर्डीचे माजी सरपंच पवन ठाकरे यांनी रोष व्यक्त केला. पालकमंत्र्यांनी वयोवृद्ध माजीमंत्री पुष्पाताई हिरे आणि पॅरॅलिसिस व स्पॉन्डिलोसिसच्या आजाराने ग्रस्त माजीमंत्री डॉ. प्रशांत हिरे यांच्यासह कुटुंबीयांना षडयंत्रात गोवण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप करीत पालकमंत्र्यांचा निषेधार्थ सोमवारी (दि.६) रोजी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधत हिरे समर्थकांनी के. बी. एच. विद्यालय येथील समाधीस्थळापासून अपर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लक्षवेधी मोर्चा काढला. प्रारंभी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या समाधीस्थळ

प्रकाशदूत

Image
चालत्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आग दोन ट्रॉली मक्याचा चारा जळून खाक प्रकाशदूत दहिवड : देवळा सौंदाणे रस्त्यावरील दहिवड गावाजवळ असणाऱ्या धोबीघाट येथे चालत्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आग लागून आगीत दोन ट्रॉली मक्याचा चारा जळून खाक झाला. एरंडगाव येथील शेतकरी संदीप दौलत देवरे हे काळवण तालुक्यातील पिळकोस बगडू येथून  एका ट्रॅक्टरला  दोन ट्रॉली  जोडून  मक्याचा चारा घेऊन येत होते. ते  दहिवड गावाकडे येत असताना  अज्ञात व्यक्तीने सिगारेटची ठिणगी मागील ट्रॉलीवर असलेल्या चाऱ्यावर टाकल्यामुळे त्या ट्रॉलीने पेट घेतला. हे वाहनचालकाच्या लक्षात आले नाही. त्याचवेळी पाठीमागून येत असलेल्या मोटरसायकलस्वारांनी ट्रॅक्टला ओव्हरटेक करत वाहनचालकाला थांबवत चाऱ्याला आग लागले असल्याचे सांगितले. यावेळी  वाहनचालकाने  प्रसंगावधान राखत ट्रॅक्टर ताबडतोब बाजूला घेत ट्रॉली सोडून दिली. आग आटोक्यात आणण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू आग इतकी जोरात होती की यात चारा पूर्णतः जळून खाक झाला. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला फोन लावला होता. परंतू अग्निशामक दल वेळेवर न पोहोचल्याने नागरिकांनी जेसीपीद्वारे च

प्रकाशदूत

Image
तिसगाव ला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण प्रकाशदूत  उमराणे : तिसगाव येथील मारुती मंदिर चौकात मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुुुरूवारी (दि.२) रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणाला गावातील मराठा समाज बांधवांनी पाठिंबा दिला.  मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे तसेच ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे या मागणीसाठी या लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणाला महेंद्र पाटील, बाळासाहेब आहेर, रविंद्र आहेर, अरविंद आहेर, संंदीप निकम, राजू जाधव, भाऊसाहेब जाधव, महेंद्र जाधव, किसन गेली, शुभम पवार, समाधान जगन्नाथ, गोकुळ देवरे, उमाकांत आहेर, प्रविण आहेर, दिपक आहेर, भरत ठाकरे, कल्पेश आहेर, मधुकर आहेर, दादासाहेब पांडुरंग, भास्कर केदा, प्रविण सदाशिव, रवींद्र जाधव, दिपक आहेर, मिलिंद आहेर, भगवान देवरे, पोपट आहेर, विक्रम आहेर, गोकुळ आहेर, गोरख आहेर, प्रल्हाद आहेर, दादासाहेब आहेर, विलास पवार, शांताराम आहेर, ज्ञानेश्वर खैरनार, माधवआहेर, विठोबा आहेर, विजय पवार, प्रविण पवार, गोकुळ ठाकरे, मन्साराम आण्णा, गोरख दौलत, प

प्रकाशदूत

Image
सकल मराठा समाजा च्या वतीने अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण प्रकाशदूत मालेगाव : मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज मालेगावच्या वतीने अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (दि.३१) पासून साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला तालुक्यातून प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात आहे. त्याच प्रमाणे साखळी उपोषण देखील केली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मालेगाव येथील सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरू केले आहे. आज सकाळी दहा वाजता या उपोषणाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी निखिल पवार, जितेंद्र देसले, भरत पाटील, क्रांती पाटील, गणेश पाटील व सुनील देवरे हे उपोषणास बसले आहेत.  राजकीय मतभेद विसरून एक मराठा लाख मराठा या ध्येर्याने पुढची वाटचाल करावी अशी भूमिका यावेळी घेण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर चाळीस दिवसाच्या आत आरक्षण देण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु शासनाने आपला शब्द पाळला नाही. त्यामुळे

प्रकाशदूत

Image
देवळा येथे आरक्षण संदर्भात सर्व मराठा नेते एकवटले  प्रकाशदूत दहिवड : एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत देवळा येथे मंगळवारी (दि.३१) रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मराठा आरक्षण संदर्भात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणात सर्व मराठा नेते एकवटले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच अनेक राजकीय नेत्यांवर रोष व्यक्त करण्यात आले. जोपर्यंत जरांगे पाटील उपोषणामध्ये आहे तोपर्यंत देवळा तालुक्यातील संपूर्ण गावातून त्यांना पाठिंबा मिळणार आहे. देवळा तालुक्यातील उमराणे येथे गेल्या आठ दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे. महाल पाटणे येथेही उपोषण सुरू आहे, गिरनारे, कुंभार्डे आणि चिंचवे आदी गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचे बॅनर फडकवण्यात आले आहेत. खर्डा येथेही उपोषण सुरू झाले आहे. तसेच देवळा तालुक्यातील अनेक संघटनांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला आहे. आज दहिवड येथील मुस्लिम बांधवांनी उमराणे येथे जाऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे. जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी इतर समाजांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी या धरणे आंदोलनात केदा

प्रकाशदूत

Image
आरोग्य विभागातील  डाटा एंट्री ऑपरेटर आजपासून संपावर प्रकाशदूत निमगाव : राज्य शासनाने यशस्वी ग्रुप (यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, पुणे) या कंपनीमार्फत ठेकेदार पद्धतीने राज्यातील आरोग्य विभागात सुमारे ३ ते ४ हजार डाटा एंट्री ऑपरेटर भरले आहेत. सदर कंपनी मनमानी पणे कारभार करत असून जेव्हा पटेल तेव्हा डाटा एन्ट्री ऑपरेटरांना कामावरून काढत आहे अशा मनमानी कारभाराला कंटाळून राज्यातील आरोग्य विभागात काम करणारे सर्व डाटा एन्ट्री ऑपरेटरांनी मंगळवारी (दि.३१) पासून आरोग्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली संप पुकारला आहे. त्या संदर्भातील निवेदन प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फैजी यांना देण्यात आले. राज्य शासनाने आरोग्य विभागातील डाटा एन्ट्रीची कामे करण्यासाठी पुणे येथील यशस्वी ग्रुप या कंपनीशी करार केला आहे. त्यानुसार यशस्वी ग्रुप कंपनी मार्फत आरोग्य विभागात डाटा एंट्री ऑपरेटरांची प्रशिक्षणार्थी म्हणून भरती केली आहे. याच डाटा एन्ट्री ऑपरेटरांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची तसेच परिवाराची चिंता न करता काम केलेले आहे. अशा डाटा एन्ट्री ऑपरेटरांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाला असून कार्यरत असलेल्या डाट