प्रकाशदूत

देवळा येथे आरक्षण संदर्भात सर्व मराठा नेते एकवटले 

प्रकाशदूत
दहिवड : एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत देवळा येथे मंगळवारी (दि.३१) रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मराठा आरक्षण संदर्भात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणात सर्व मराठा नेते एकवटले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच अनेक राजकीय नेत्यांवर रोष व्यक्त करण्यात आले. जोपर्यंत जरांगे पाटील उपोषणामध्ये आहे तोपर्यंत देवळा तालुक्यातील संपूर्ण गावातून त्यांना पाठिंबा मिळणार आहे.

Published from Blogger Prime Android App

देवळा तालुक्यातील उमराणे येथे गेल्या आठ दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे. महाल पाटणे येथेही उपोषण सुरू आहे, गिरनारे, कुंभार्डे आणि चिंचवे आदी गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचे बॅनर फडकवण्यात आले आहेत. खर्डा येथेही उपोषण सुरू झाले आहे. तसेच देवळा तालुक्यातील अनेक संघटनांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला आहे. आज दहिवड येथील मुस्लिम बांधवांनी उमराणे येथे जाऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे.

Published from Blogger Prime Android App

जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी इतर समाजांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी या धरणे आंदोलनात केदा आहेर, योगेश आहेर, विजय पगार, पंडित निकम, भाऊसाहेब पगार, जितू अण्णा आहेर यांसह बहुसंख्य नेते उपस्थित होते. दोन शाळेत जाणाऱ्या कॉलेज तरुणींना बोलवून या ठिकाणी तहसीलदार सूर्यवंशी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांना आरक्षण संदर्भात निवेदन देण्यात आले. या ठिकाणी देवळा परिसरातील अनेक गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत