प्रकाशदूत

चालत्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आग

दोन ट्रॉली मक्याचा चारा जळून खाक

प्रकाशदूत
दहिवड : देवळा सौंदाणे रस्त्यावरील दहिवड गावाजवळ असणाऱ्या धोबीघाट येथे चालत्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आग लागून आगीत दोन ट्रॉली मक्याचा चारा जळून खाक झाला.

Published from Blogger Prime Android App

एरंडगाव येथील शेतकरी संदीप दौलत देवरे हे काळवण तालुक्यातील पिळकोस बगडू येथून एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून मक्याचा चारा घेऊन येत होते. ते दहिवड गावाकडे येत असताना अज्ञात व्यक्तीने सिगारेटची ठिणगी मागील ट्रॉलीवर असलेल्या चाऱ्यावर टाकल्यामुळे त्या ट्रॉलीने पेट घेतला. हे वाहनचालकाच्या लक्षात आले नाही. त्याचवेळी पाठीमागून येत असलेल्या मोटरसायकलस्वारांनी ट्रॅक्टला ओव्हरटेक करत वाहनचालकाला थांबवत चाऱ्याला आग लागले असल्याचे सांगितले. यावेळी वाहनचालकाने प्रसंगावधान राखत ट्रॅक्टर ताबडतोब बाजूला घेत ट्रॉली सोडून दिली. आग आटोक्यात आणण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू आग इतकी जोरात होती की यात चारा पूर्णतः जळून खाक झाला. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला फोन लावला होता. परंतू अग्निशामक दल वेळेवर न पोहोचल्याने नागरिकांनी जेसीपीद्वारे चारा खाली टाकत ट्रॉली वाचवली यावेळी संबंधित शेतकऱ्याला चारा भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत