प्रकाशदूत

सौंदाणे शिवारात वाहनासह ९४ लाखांचे मद्य जप्त

प्रकाशदूत
मालेगाव / उमराणे : तालुक्यातील सौंदाणे शिवारातील मुंबई- आग्रा महामार्गावरील हॉटेल तुळजाई समोर मालेगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत वाहन, मद्यासह ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मद्यसाठा घेणारा, पुरवठादार व वाहनमालक यांच्या विरोधात व इतर अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

Published from Blogger Prime Android App

मालेगाव विभाग राज्य उत्पादन शुल्कपथकाला मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.६) रोजी सदर कारवाई करण्यात आली. पथकाने सापळा रचून वाहन तपासणी करताना आयशर कंपनीचे सहाचाकी मालवाहतुक वाहन क्रमांक (जीजे ३५ टी ३५३८) अडवले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवा राज्यात निर्मिती व विक्री करीता असलेला परराज्यातील मद्याचा साठा मिळून आला. या कारवाईत पथकाने वाहनासह ९०० बॉक्स विदेशी मद्य व बियरचा साठा असा एकूण ९४ लाख २४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहनचालक कमलेश भारमल राम यास अटक करण्यात आली असून मद्यसाठा घेणारा, पुरवठादार व जप्त वाहनमालक यांचे विरोधात व इतर अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दशरथ जगताप, दुय्यम निरीक्षक हर्षराज इंगळे, पंढरीनारथ कडभाने, येवला विभागाचे निरीक्षक व्ही. ए. चौरे, दुय्यम निरीक्षक एस. आर. वाकचौरे, पी. आर. मंडलीक, सहा. दुय्यम निरीक्षक वंदना देवरे, अवधुत पाटील व जवान दिपक गाडे, शाम पानसरे, प्रविण अस्वले, डिगंबर पालवी, विठ्ठल हाके, अमन तडवी, संतोष मुंडे, मुकेश निंबेकर यांच्या पथकाने हे कारवाई केली.

Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत