प्रकाशदूत


आरोग्य विभागातील डाटा एंट्री ऑपरेटर आजपासून संपावर

प्रकाशदूत
निमगाव : राज्य शासनाने यशस्वी ग्रुप (यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, पुणे) या कंपनीमार्फत ठेकेदार पद्धतीने राज्यातील आरोग्य विभागात सुमारे ३ ते ४ हजार डाटा एंट्री ऑपरेटर भरले आहेत. सदर कंपनी मनमानी पणे कारभार करत असून जेव्हा पटेल तेव्हा डाटा एन्ट्री ऑपरेटरांना कामावरून काढत आहे अशा मनमानी कारभाराला कंटाळून राज्यातील आरोग्य विभागात काम करणारे सर्व डाटा एन्ट्री ऑपरेटरांनी मंगळवारी (दि.३१) पासून आरोग्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली संप पुकारला आहे. त्या संदर्भातील निवेदन प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फैजी यांना देण्यात आले.

Published from Blogger Prime Android App

राज्य शासनाने आरोग्य विभागातील डाटा एन्ट्रीची कामे करण्यासाठी पुणे येथील यशस्वी ग्रुप या कंपनीशी करार केला आहे. त्यानुसार यशस्वी ग्रुप कंपनी मार्फत आरोग्य विभागात डाटा एंट्री ऑपरेटरांची प्रशिक्षणार्थी म्हणून भरती केली आहे. याच डाटा एन्ट्री ऑपरेटरांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची तसेच परिवाराची चिंता न करता काम केलेले आहे. अशा डाटा एन्ट्री ऑपरेटरांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाला असून कार्यरत असलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटरांना कंपनी आपल्या मनमानी कारभारने जेव्हा पटेल तेव्हा कामावरून काढत आहे. अशा मनमानी कारभाराला कंटाळून राज्यातील आरोग्य विभागात काम करणारे संपूर्ण डाटा एंट्री ऑपरेटर यांनी संप पुकारला आहे. तालुक्यातील सर्व डाटा एन्ट्री ऑपरेटरांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फैजी यांना निवेदन देऊन मंगळवारी (दि.३१) पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या कामबंद आंदोलनात अमोल घुमरे, मृणाल शार्दूल, प्रवीण शिंदे, कमलेश देवरे, नितीन पवार, रवींद्र शिरसाठ, केशव दशमुखे, अविनाश शेजवळ, गुफारान अहमद, प्रसाद हिरे, दीपक पदमर आदी सहभागी झाले आहेत.


शासनाने मनमानी कारभार करणाऱ्या यशस्वी ग्रुप कडून करार काढून घ्यावा. महाराष्ट्रातील संपूर्ण डाटा एन्ट्री ऑपरेटरांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सामावून घ्यावे किंवा शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी ही डाटा एन्ट्री ऑपरेटरांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत