Posts

प्रकाशदूत

Image
धुळे मतदार संघात डॉ. सुभाष भामरे व डॉ. शोभा बच्छाव यांना पक्षांतर्गत विरोध महायुती व महाविकास आघाडीत सर्वच आलबेल नसल्याचे चित्र प्रकाशदूत दाभाडी : नीलेश शिंपी धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना छुप्या पध्दतीने तर महाविकास आघाडीच्या उमेदवार माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उघड पक्षांतर्गत विरोध होत आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना पक्षांतर्गत गटबाजी शमविण्याबरोबरच सक्षम प्रचार यंत्रणा उभारण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. तर दुसरीकडे मित्र पक्षाची ही मनधरणी करण्याची वेळ उमेदवारांवर आल्यामुळे महायुती व महाविकास आघाडीत अद्यापपर्यंत तरी सर्वच आलबेल नसल्याचे चित्र आहे. धुळे लोकसभा मतदार संघाची जागा महायुतीतील भाजपकडे तर महाविकास आघाडीची जागा काँग्रेस पक्षाकडे गेली आहे. वंचितने सेवानिवृत्त अधिकारी अब्दुल रहेमान यांना उमेदवारी दिली आहे. रहेमान सोडता डॉ. भामरे व डॉ. बच्छाव यांना पक्षांतर्गत विरोध झाला आहे. विद्यमान खासदार डॉ. भामरे यांना पहिल्या टप्प्यातच उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे भाजपाकडून लोकसभेसाठी इच्छुक असणार्‍याच्या पदरी नि

प्रकाशदूत

Image
पोलीस हवालदार लाच लुचपत  प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात प्रकाशदूत दाभाडी : तक्रारदार यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार न घेता तडजोड करुन पैसे काढून देण्यासाठी न्यायालय आवारात दोन हजार रुपयांची लाच घेताना पवारवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार दिलीप निकम (५७, रा. साकोरा ता. नांदगाव) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. तक्रारदार हे शेती खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असून त्यांनी मित्र अल्ताफ यास त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी हातउसणे म्हणून दोन महिन्यांच्या बोलीवर ५० हजार रुपये दिले होते. परंतु दोन महिने पुर्ण होवूनही तक्रारदार यांचा मित्र अल्ताफ हा मागणी करुन ही पैसे देत नसल्याने त्यांच्यात भांडण झाले. त्यामुळे अल्ताफ हा मंगळवारी (दि.२३) रोजी पवारवाडी पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेला होता. यावेळी पोलीस हवालदार निकम यांनी तक्रारदार यांना फोन करुन पोलिस ठाण्यात बोलाविले. तक्रारदार यांनी त्यांचे दाजी यांना पोलीस हवालदार निकम यांना भेटण्यास पाठविले. यावेळी पोलीस हवालदार निकम यांनी अल्ताफ याची तक्रार न घेता तडजोड करून देण्याच्या बदल्यात पाच हजार रुपयाची मागणी के

प्रकाशदूत

Image
धुळ्यात डॉ. तुषार शेवाळेंच्या रूपाने तिसर्‍या पर्यायाची चर्चा प्रकाशदूत दाभाडी : नीलेश शिंपी      धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे नाराज झाले. त्यांनी पदाचा राजीनामा देत नाराजी व्यक्त केली. मात्र, ही नाराजी राजीनाम्यापुरती मर्यादित नसून ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. डॉ. शेवाळे यांच्या रूपाने धुळ्यात तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली गतिमान झाल्यास याचा फटका काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना बसण्याची शक्यता आहे      भौगोलिकदृष्ट्या धुळे लोकसभा मतदारसंघ मोठा आहे. धुळे जिल्ह्यात धुळे शहर, धुळे ग्रामीण व शिंदखेडा या तीन विधानसभा मतदारसंघाचा तर नाशिक जिल्ह्यात मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या तीन मतदारसंघांचा समावेश होतो. यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण हे तीन विधानसभा मतदारसंघ नेहमीच किंगमेकरची भूमिका निभावत आले आहेत. गेल्या तीन निवडणुकीपासून दोन्ही पक्षांचे प्रमुख उमेदवार धुळे जिल्ह्यातीलच राहिले आहेत. यावेळी ‘कसमादे’चा उमेदवार उभा राहिल्यास निवडणुकीची समीकरणे बदलू श

प्रकाशदूत

Image
विहिरीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या  माय लेकींचा विहिरीत पडून मृत्यू  ; झोडगे येथील घटना प्रकाशदूत दाभाडी :  तालुक्यातील झोडगे येथे गावाजवळ असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या माय लेकीचा गुरुवारी (दि.4) रोजी विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. निताबाई जाधव (वय 47) व इच्छामणी जाधव (वय 16) असे मृत्यूमुखी पडलेल्या माय लेकीचे नावे आहेत. गेल्या वर्षीच निताबाई यांचे पती बाळू जाधव यांचे निधन झाले आहे. पती पाठोपाठ वर्षानंतर पत्नी व मुलीचा ही मृत्यू झाल्याने जाधव परिवारावर दु;खाचा डोंगर कोसळा असून या दु;खद घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. माळमाथा भागासह झोडगे परिसरात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. झोडगेसह परिसरात सद्या वीस दिवसानंतर गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते. शेत शिवारातील अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. ज्या काही विहिरंना थोडेफार पाणी उपलब्ध आहे. अशा ठिकाणी गावातील महिला कपडे धुण्यासाठी व पाण्यासाठी विहिरींवर जातात. तर पशुपालक शेत शिवारातील विहिरींवर जाऊन जनावरांची तहान भागवत आहेत. गावातील निताबाई व त्यांची मुलगी ईच्छामणी या गुरुवारी दुपारच्यावेळी गावा शेजारी   डोंगराजवळ असल

प्रकाशदूत

Image
शेततळ्यात  बुडून दोघा  सख्या भावांचा मृत्यू देवळा तालुक्यातील हृदयद्रावक घटना प्रकाशदूत दाभाडी : देवळा तालुक्यातील बुटेश्वर शिवारात आज बुधवारी (दि.२०) संध्याकाळच्या सुमारास  तेजस (१२) व मानव आहेर (६) वर्ष या दोघा  सख्या भावांचा  शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने  गावात शोककळा पसरली. खामखेडा गावातील बुटेश्वर शिवारातील डोंगराला लागून असलेल्या शेतात गणेश संतोष आहेर हे राहतात. त्यांची दोन्ही मुलं तेजस व मानव आहेर हे आज दुपारच्या सुमारास शाळेतून घरी परत आले. त्यांच्या शेतात उन्हाळ कांदा काढणी सुरू असल्याने ते दोन्ही भाऊ आई वडिलांना मदत करण्यासाठी शेतात होते. दुपारच्या वेळी येथे जवळच्या डोंगरावरुन काही वानरांची टोळी शेतात आली असता त्यांना हुसकावण्याच्या नादात दोन्ही भाऊ त्यांच्या मागे धावले. वानरांना हुसकून आल्यानंतर जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यात पाणी पाहायला गेले असता मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी लहान भाऊ मानव याने हात दिला. मात्र तोही शेततळ्यात घसरला. त्यांच्या सोबत असलेल्या चार वर्षीय बहिनेने शेतात पळत येऊन काकांन

प्रकाशदूत

Image
तेरा वर्षीय मुलाने साडेतीन वर्षीय बालकाला फेकले साचलेल्या सांडपाण्यात नाका-तोंडात सांडपाणी गेल्याने बालकाचा मृत्यू ; पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रकाशदूत मालेगाव :  शहरातील दातारनगर भागातील हलवई मशिदीजवळील कारखान्यामागे साचलेल्या सांडपाण्यात विधिसंघर्षित तेरा वर्षीय मुलाने त्याच्यासमवेत खेळणार्‍या हस्सान मलिक मुदस्सीर हुसेन या साडेतीन वर्षीय बालकाला सांडपाण्याच्या नाल्यात फेकल्याची घटना बुधवारी (दि.६) दुपारी घडली. बालकाच्या नाका-तोंडात सांडपाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात विधिसंघर्षित मुलाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दातारनगर भागात राहणारे चार लहान मुले विधीसंघर्षीत तेरा वर्षीय मुलाबरोबर खेळत होती. खेळत असताना ही मुले सांडपाण्याच्या डबक्याजवळ गेली. काहीवेळा येथे ही बालके घुटमळली. यानंतर संशयित तेरा वर्षीय टोपी घातलेल्या मुलाने हस्सान मलीक मुदस्सीर हुसेन (रा. दातारनगर, रमजानपुरा) याला उचलून सांडपाण्याच्या डबक्यात फेकून दिले. यानंतर सदर मुलगा पळून गेला. यादरम्यान एक लहान मुलाने पाण्यात उतरण्याचा प

प्रकाशदूत

Image
मालेगावी मंगल कार्यालयात शिरलेल्या बिबट्या जेरबंद प्रकाशदूत मालेगाव :  मालेगाव-नामपूर रस्त्यावरील मंगल कार्यालयात शिरलेल्या बिबट्याला दोन तासांच्या परिश्रमांनंतर जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. ही घटना मंगळवारी (दि. ५) सकाळी ७ च्या सुमारास घडली. भर वस्तीत बिबट्या आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा विवट्या पाण्याच्या शोधात आला असावा असा कयास जमलेल्या गर्दीतून लावण्यात येत होता. शहरातील मालेगाव - नामपूर रस्त्यावर साई सेलिब्रेशन हॉल आहे. त्याला लागूनच कार्यालय व इतर गाळे आहेत. याच कार्यालयातील रखवालदार विजय अहिर यांचा मुलगा मोहित अहिरे (१३) हा कार्यालयात मोबाइल पाहात बसलेला होता. सकाळची वेळ असल्याने सर्व गाळे बंद होते. फक्त कार्यालयच उघडे होते. अचानक बिबट्या डरकाळ्या फोडत मोहितच्या  जवळून कार्यालयात आत शिरला. मोहितने त्याला मध्ये जाऊ देत न घाबरता हळूच उठून धिटाईने दरवाजा बंद करत कार्यालयाबाहेर धूम ठोकली. त्यानंतर त्याने वडिलांना बिबट्या कार्यालयात कोंडल्याची माहिती दिली. त्यांनी कार्यालयाच्या संचालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी वनविभागाला कळविले