प्रकाशदूत

सकल मराठा समाजाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण

प्रकाशदूत
मालेगाव : मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज मालेगावच्या वतीने अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (दि.३१) पासून साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला.

Published from Blogger Prime Android App

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला तालुक्यातून प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात आहे. त्याच प्रमाणे साखळी उपोषण देखील केली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मालेगाव येथील सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरू केले आहे. आज सकाळी दहा वाजता या उपोषणाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी निखिल पवार, जितेंद्र देसले, भरत पाटील, क्रांती पाटील, गणेश पाटील व सुनील देवरे हे उपोषणास बसले आहेत. 

राजकीय मतभेद विसरून एक मराठा लाख मराठा या ध्येर्याने पुढची वाटचाल करावी अशी भूमिका यावेळी घेण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर चाळीस दिवसाच्या आत आरक्षण देण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु शासनाने आपला शब्द पाळला नाही. त्यामुळे शासनाचा निषेध करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांची सर्वांना चिंता आहे. त्यांच्या जीवितास काही झाल्यास त्याची जबाबदारी सरकारची राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला. या उपोषणाला धान्य वितरण दुकानदार संघटना, वंचित बहुजन आघाडी व वकिल संघाच्या सदस्यांनी पाठींबा दिला आहे. त्याच प्रमाणे आंदोलन सुरू असताना प्रशासनाच्या वतीने गुन्हे दाखल झाल्यास त्या केसेस विनामूल्य न्यायालयात चालविण्यात येतील असे आश्वासन वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर देवरे, सचिव ॲड. किशोर त्रिभुवन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी सुनील गायकवाड, प्रविण इनामदार, कल्पेश गायकवाड, योगेश पवार, विठ्ठल पवार, नीलेश पाटील, सभी आहेर, मनोहर बच्छाव, अँड. आर. के. बच्छाव, संजय पाटील, प्रा. जगदीश खैरनार, नंदराज सूर्यवंशी, मदन गायकवाड, अनिल हिरे, प्रशांत जाधव, जितेंद्र आहिरे, किशोर शिंदे, अनिल भुसे, आदर्श बच्छाव, अंश पाटील, रजत सोनवणे, डॉ. जतिन कापडणीस, डॉ. संतोष पाटील, ताराचंद बच्छाव, तानाजी देशमुख, संजय दुसाने आदींसह सर्व राजकिय पक्ष, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत