Posts

प्रकाशदूत

Image
... त्या वक्तव्याशी भाजपाचा संबंध नाही : ना. चंद्रकांत पाटील प्रकाशदूत दाभाडी : नीलेश शिंपी गेल्या आठवड्यात मालेगावचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. त्यामुळे येथील राजकिय वातावरण ढवळून निघाले होते. आ. राणे यांच्या वक्तव्याचा हिंदू-मुस्लीम एकता संघटनेसह विविध पक्ष व सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता.  शनिवारी (दि.११) रोजी मालेगावच्या दौर्‍यावर आलेले राज्याचे तंत्र व उच्चशिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांना याबाबत पश्न विचारला असता  आ. राणे यांचे वक्तव्य हे पक्षाचे नव्हे तर त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट केले. येथील शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. निलेश कचवे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. मुंबईत आमदार राणे यांनी मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान म्हणून केल्याने या वक्तव्यावर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. हिंदू-मुस्लीम समाजात भानगडी लावण्याचा उद्देशाने आ. राणे वक्तव्य करत आहेत. सागर बंगल्यावर आपला बॉस बसलाय आ

प्रकाशदूत

Image
वाहनचालकांनी स्वयंशिस्त  लावून घेतली पाहिजे : जाधव प्रकाशदूत मालेगाव : महामार्गावरील अपघातात बळी पडणार्‍यांची संख्या चिंताजनक आहे. अपघाताला आळा बसावा यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी वाहनचालकांनी स्वयंशिस्त लावून घेतली पाहिजे असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी केले. मालेगाव येथील कृऊबाच्या मुंगसे उपबाजाराच्या 15 व्या वर्धापनदिनी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृऊबाचे उपसभापती अ‍ॅड. विनोद चव्हाण होते. व्यासपिठावर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रवींद्र मगर, मोटर वाहन निरिक्षक मोहन शिंदे, पुनम पवार, सोमनाथ घोलप, अध्यक्ष रामूशेठ सुर्यवंशी, जितू कापडणेकर उपस्थित होते. अपघातामुळे जीवितहानी होण्याबरोबरच संबंधित कुटूंबावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक सुजान नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन उपसभापती अ‍ॅड. चव्हाण यांनी केले. यावेळी पोलीस निरिक्षक मगर यांचे भाषण झाले. यावेळी उपबाजार आवारातील टॅ्रक्टर ट्रॉलीसह अन्य वाहनांना रिफ्लेक्ट

प्रकाशदूत

Image
विज्ञान प्रदर्शनात नाविन्याचा ध्यास घेऊन समाज उपयोगी उपकरणे बनवा : डॉ. मच्छिंद्र कदम  सा. प्रकाशदूत दहिवड : विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तेच तेच उपकरण बनविण्यापेक्षा नाविन्याचा ध्यास घेऊन उपकरण केले पाहिजे. ही उपकरणे समाज उपयोगी पडतील अशी बनविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नाशिक माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे विभागीय सचिव डॉ. मच्छिंद्र कदम यांनी केले. येथील जिजामाता माध्यमिक विद्यालय विज्ञान प्रदर्शनाप्रसंगी ते बोलत होते. यशस्वी होण्यासाठी गुणवत्ते बरोबर परिश्रम व जिद्द आवश्यक असल्याचे सांगून ते म्हणाले, शिक्षकांनी सुद्धा दर्जेदार अध्यापन होण्यासाठी ज्ञान अद्यावत ठेवले पाहिजे. कॉपीमुक्त परीक्षा होणे ही बाब विद्यार्थ्यांच्या जीवनास कलाटणी देणारी ठरू शकते असे ही कदम म्हणाले.      देवळा तालुक्यातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय २० व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन (दि.१८) रोजी संजय आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव तर दुसऱ्या दिवशी धनश्री आहेर होत्या. व्यासपीठावर देवळा नगरपंचायतिच्या

प्रकाशदूत

Image

प्रकाशदूत

Image

प्रकाशदूत

Image

प्रकाशदूत

Image
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुुळे   काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळेंच्या भेटीला शहरासह तालुक्याच्या राजकिय वर्तुळात चर्चांना उधान  प्रकाशदूत मालेगाव :  मालेगाव दौऱ्यावर आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुुळे यांनी थेट काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या निवास्थानी अचानक भेट दिल्याने शहरासह तालुक्याच्या राजकिय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. अवघ्या सहा महिन्यावर येऊन ठेपलेल्या आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची भाजपाने तयारी सुरू केली आहे. महाविजय संकल्प २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे  राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्याचाच भाग म्हणून धुळेे लोकसभा मतदार संघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या तीन विधानसभा मतदार संघातील सुपर वॉरियर्स व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते शनिवारी (दि.२५) रोजी मालेगावी आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे मोसमपूल मार्गे धुळ्याकडे जात असतांना ते अचानक काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या निवास्थानी गेले. यावेळी घरी आलेल्या बावनकुळे यांचा डॉ. शे