प्रकाशदूत

वाहनचालकांनी स्वयंशिस्त 

लावून घेतली पाहिजे : जाधव

प्रकाशदूत
मालेगाव : महामार्गावरील अपघातात बळी पडणार्‍यांची संख्या चिंताजनक आहे. अपघाताला आळा बसावा यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी वाहनचालकांनी स्वयंशिस्त लावून घेतली पाहिजे असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी केले.

Published from Blogger Prime Android App

मालेगाव येथील कृऊबाच्या मुंगसे उपबाजाराच्या 15 व्या वर्धापनदिनी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृऊबाचे उपसभापती अ‍ॅड. विनोद चव्हाण होते. व्यासपिठावर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रवींद्र मगर, मोटर वाहन निरिक्षक मोहन शिंदे, पुनम पवार, सोमनाथ घोलप, अध्यक्ष रामूशेठ सुर्यवंशी, जितू कापडणेकर उपस्थित होते.

Published from Blogger Prime Android App

अपघातामुळे जीवितहानी होण्याबरोबरच संबंधित कुटूंबावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक सुजान नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन उपसभापती अ‍ॅड. चव्हाण यांनी केले. यावेळी पोलीस निरिक्षक मगर यांचे भाषण झाले. यावेळी उपबाजार आवारातील टॅ्रक्टर ट्रॉलीसह अन्य वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले. रवींद्र सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालक डॉ. उज्जेन इंगळे, सुभाष पाटील, रवींद्र निकम, चंद्रकांत शेवाळे, राजेंद्र पवार, बंडू पगार, नाना सोनजकर, अनिल देवरे, भिका कोतकर, संजय घोडके, विनोद बोरसे, रवी साळुंके, सचिव कमलेश पाटील, किरण दळवी यांच्यासह शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत