प्रकाशदूत

विज्ञान प्रदर्शनात नाविन्याचा ध्यास घेऊन समाज उपयोगी उपकरणे बनवा : डॉ. मच्छिंद्र कदम 

सा. प्रकाशदूत
दहिवड : विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तेच तेच उपकरण बनविण्यापेक्षा नाविन्याचा ध्यास घेऊन उपकरण केले पाहिजे. ही उपकरणे समाज उपयोगी पडतील अशी बनविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नाशिक माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे विभागीय सचिव डॉ. मच्छिंद्र कदम यांनी केले.

येथील जिजामाता माध्यमिक विद्यालय विज्ञान प्रदर्शनाप्रसंगी ते बोलत होते. यशस्वी होण्यासाठी गुणवत्ते बरोबर परिश्रम व जिद्द आवश्यक असल्याचे सांगून ते म्हणाले, शिक्षकांनी सुद्धा दर्जेदार अध्यापन होण्यासाठी ज्ञान अद्यावत ठेवले पाहिजे. कॉपीमुक्त परीक्षा होणे ही बाब विद्यार्थ्यांच्या जीवनास कलाटणी देणारी ठरू शकते असे ही कदम म्हणाले.
    
देवळा तालुक्यातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय २० व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन (दि.१८) रोजी संजय आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव तर दुसऱ्या दिवशी धनश्री आहेर होत्या. व्यासपीठावर देवळा नगरपंचायतिच्या नगराध्यक्षा भाग्यश्री पवार,  जि. प. शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील, नगराध्यक्ष मनोज आहेर, कृउबाचे संचालक भाऊसाहेब पगार, विस्तार अधिकारी के. एन. विसावे, जिल्हा विज्ञान अध्यक्ष सचिन शेवाळे, राजेंद्र कापडणीस, घनश्याम बैरागी, मनोज गवळी, अजित आहिरराव, वैशाली पाटील, महेंद्र सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Published from Blogger Prime Android App

जिजामाता माध्यमिक विद्यालयातील दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात ३९ शाळांचा सहभाग असून यात विद्यार्थ्यांनी एकूण ६९ विज्ञान प्रतिकृतींचे सादरीकरण केले होते. विज्ञान तंत्रज्ञानाच्या समाज उपयोगी उपकरणांवर विशेष लक्ष वेधत शेती, आरोग्य, दळणवळण, संगणक या प्रमुख विषयावर आधारित तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याची या प्रदर्शनात मांडणी केली होती. यात प्राथमिक गट विद्यार्थी २९, माध्यमिक गट विद्यार्थी ३५, प्राथमिक शैक्षणिक साहित्य शिक्षक ४, माध्यमिक शैक्षणिक साहित्य ४, परिचर प्रयोगशाळा सहाय्यक २ अशा एकूण ७४ विद्यार्थी व शिक्षकांचा विज्ञान प्रदर्शनात सहभाग असून वाय. एन. सूर्यवंशी, पी. आर. सोनवणे, एस. एन. आहेर, सी. एम. पाटील यांनी परीक्षण केले होते. यावेळी दहिवड उपसरपंच राजाराम ठाकरे, बापू पवार, संजय दहिवडकर, वाल्मिक सोनवणे, पुंजाराम देवरे, अतुल पवार, नगरसेवक जितेंद्र आहेर, दिलीप आहेर, डॉ. प्रशांत निकम, योगेश आहेर आदींनी उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनील शिंदे व विज्ञान शिक्षक यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

विजेत्या स्पर्धकांचे व शाळेचे नावे
विज्ञान मेळावा - प्रथम तृप्ती निकम, द्वितीय दिव्या मेणे, तृतीय सुचिता पवार, उत्तेजनार्थ नेजल पवार.

विज्ञान नाटिका - प्रथम जनता विद्यालय लोहणेर, द्वितीय पिंपळेश्वर विद्यालय वाखारी, तृतीय जिजामाता माध्यमिक विद्यालय दहिवड, उत्तेजनार्थ रुक्मिणी माध्यमिक विद्यालय मटाने.

प्रयोग शाळा - प्रथम श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा, द्वितीय मराठा हायस्कूल उमराणे,

शैक्षणिक साहित्य प्राथमिक गट - प्रथम जि. प. शाळा मुली, द्वितीय जनता विद्यालय मेशी, तृतीय जि. प. शाळा कापशी.

शैक्षणिक साहित्य माध्यमिक गट - प्रथम जि. प. विद्यानिकेतन शॉर्टन देवळा, द्वितीय पिंपळेश्वर विद्यालय वाखारी, तृतीय सिद्धेश्वर विद्यालय वाखारी.

शैक्षणिक साहित्य प्राथमिक गट - 
प्रथम जि. प. शाळा मुली, द्वितीय जनता विद्यालय मेशी, तृतीय जि. प. शाळा कापशी.

प्राथमिक गट ६ ते ८ - प्रथम जनता विद्यालय मेशी, द्वितीय जनता विद्यालय खामखेडा, तृतीय जनता कन्या विद्यालय देवळा, उत्तेनार्थ प्लेमिंगो इंटरनॅशनल स्कूल लोहणेर.

माध्यमिक गट ९ ते १२ -
प्रथम जनता विद्यालय देवळा, द्वितीय जिजामाता माध्यमिक विद्यालय दहिवड, तृतीय कर्मवीर रामरावजी आहेर विद्यालय सुभाष नगर, उत्तेजनार्थ रुक्मिणी माध्यमिक विद्यालय मटाणे.

आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार -
प्रथम डी. एस. गुप्ते, द्वितीय बी. वी. देवरे, तृतीय रुपाली बच्छाव.                

Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत