प्रकाशदूत

... त्या वक्तव्याशी भाजपाचा संबंध नाही : ना. चंद्रकांत पाटील
प्रकाशदूत

दाभाडी : नीलेश शिंपी
गेल्या आठवड्यात मालेगावचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. त्यामुळे येथील राजकिय वातावरण ढवळून निघाले होते. आ. राणे यांच्या वक्तव्याचा हिंदू-मुस्लीम एकता संघटनेसह विविध पक्ष व सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. शनिवारी (दि.११) रोजी मालेगावच्या दौर्‍यावर आलेले राज्याचे तंत्र व उच्चशिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांना याबाबत पश्न विचारला असता आ. राणे यांचे वक्तव्य हे पक्षाचे नव्हे तर त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट केले.

येथील शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. निलेश कचवे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले.

Published from Blogger Prime Android App

मुंबईत आमदार राणे यांनी मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान म्हणून केल्याने या वक्तव्यावर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. हिंदू-मुस्लीम समाजात भानगडी लावण्याचा उद्देशाने आ. राणे वक्तव्य करत आहेत. सागर बंगल्यावर आपला बॉस बसलाय आपल कोणी काही करू शकत नाही अशी वक्तव्य राणे करत असतात. त्यामुळे सागर बंगल्याच्या सांगण्यावरूनच असे वक्तव्य त्यांनी केले का? असा सवाल मालेगावकरांच्या मनात होता. परंतू ना. पाटील यांनी आ. राणे यांचे वक्तव्य हे पक्षाचे नव्हे तर त्यांचे वैयक्तीक मत असल्याचे स्पष्ट केले. यापुढे त्यांनी असे वक्तव्य करू नये यासंदर्भात त्यांना समज देण्यात येईल असे ना. पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठा आणक्षासंदर्भात त्यांना विचारले असता ना. पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन भरवण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा. ओबीसी समाजात समन्वय साधला आहे. जरांगे पाटील यांची मागणी मान्य करताना ओबीसींना धक्का लागला नाही. कुणबी नोंद असणार्‍यांना दाखला मिळेल. सगेसोयरेच्या विषयामध्येही कुठेही ओबीसींना धक्का लागत नाही. तरीही या महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला एसीबीसी चे आरक्षण मिळणार आहे. मराठा समाजाचे एैतिहासिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणाच्या आधारे मागास आयोगाच्या अहवालाचे काम सुरू असल्याचे ही ना. पाटील यांनी सांगितले. यावेळी युवा सेना विस्तारक अविष्कार भुसे, भाजप प्रदेश सदस्य दादा जाधव, लकी गिल, विनोद वाघ, हरिप्रसाद गुप्ता आदींसह शिवसेना, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भुसे पितापुत्राने केले स्वागत
मालेगावच्या दौर्‍यावर आलेले राज्याचे तंत्र व उच्चशिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पालकमंत्री दादा भुसे व  युवा सेना विस्तारक अविष्कार भुसे यांनी स्वागत केले. आज पर्यंतच्या राजकिय कार्यकाळात प्रथमच भुसे पिता-पुत्राने एखाद्या मंत्र्याचे स्वागत करण्याचा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.





Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत