प्रकाशदूत

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळेंच्या भेटीला

शहरासह तालुक्याच्या राजकिय वर्तुळात चर्चांना उधान 

प्रकाशदूत
मालेगाव : मालेगाव दौऱ्यावर आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुुळे यांनी थेट काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या निवास्थानी अचानक भेट दिल्याने शहरासह तालुक्याच्या राजकिय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

Published from Blogger Prime Android App

अवघ्या सहा महिन्यावर येऊन ठेपलेल्या आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची भाजपाने तयारी सुरू केली आहे. महाविजय संकल्प २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे  राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्याचाच भाग म्हणून धुळेे लोकसभा मतदार संघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या तीन विधानसभा मतदार संघातील सुपर वॉरियर्स व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते शनिवारी (दि.२५) रोजी मालेगावी आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे मोसमपूल मार्गे धुळ्याकडे जात असतांना ते अचानक काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या निवास्थानी गेले. यावेळी घरी आलेल्या बावनकुळे यांचा डॉ. शेवाळे यांनी सत्कार केला. बावनकुळे हे जवळपास २० ते २५ मिनिटे डॉ. शेवाळे यांच्या घरी थांबले होते. आपला मुलगा आणि आणि शेवाळे यांचा मुलगा हे दोघे वर्गमित्र आहेत. डॉ. शेवाळे यांच्या मुलाच्या आग्रहामुळेच आपण त्यांच्या घरी चहापानासाठी आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मध्यंतरी डॉ. तुषार शेवाळे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा तालुक्यात होती. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे यांच्या निवास्थानी भेेटीसाठी गेले. या भेटीमागे कारण काही जरी असले तरी सुध्दा शहरासह तालुक्याच्या राजकिय वर्तुळात भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे यांच्या भेटीने चर्चांना उधान आले आहे.


Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत