Posts

प्रकाशदूत

Image

प्रकाशदूत

Image

प्रकाशदूत

Image
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुुळे   काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळेंच्या भेटीला शहरासह तालुक्याच्या राजकिय वर्तुळात चर्चांना उधान  प्रकाशदूत मालेगाव :  मालेगाव दौऱ्यावर आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुुळे यांनी थेट काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या निवास्थानी अचानक भेट दिल्याने शहरासह तालुक्याच्या राजकिय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. अवघ्या सहा महिन्यावर येऊन ठेपलेल्या आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची भाजपाने तयारी सुरू केली आहे. महाविजय संकल्प २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे  राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्याचाच भाग म्हणून धुळेे लोकसभा मतदार संघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या तीन विधानसभा मतदार संघातील सुपर वॉरियर्स व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते शनिवारी (दि.२५) रोजी मालेगावी आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे मोसमपूल मार्गे धुळ्याकडे जात असतांना ते अचानक काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या निवास्थानी गेले. यावेळी घरी आलेल्या बावनकुळे यांचा डॉ. शे

प्रकाशदूत

Image
सुपर वॉरियर्सांची  मेहनत आता पक्षासाठी नसून देशासाठी :  भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे    प्रकाशदूत मालेगाव :  सुपर वॉरियर्स म्हणजे जिल्ह्यातील प्रमुख योद्धे आहेत.  आपण करीत असलेली मेहनत आता पक्षासाठी नसून देशासाठी आहे. सुपर वॉरीयर्सने किमान तीन तास २०२४ पर्यंत पक्षाला दिल्यास आपण ३४० पेक्षा जास्त खासदार लोकसभेत नक्कीच निवडून देऊ शकतो असा विश्वास भाजप  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. महाविजय संकल्प २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद अभियानांतर्गत येथील भाजप मालेगाव जिल्हा अंतर्गत असलेल्या मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य व बागलाण विधानसभा अशा तीन विधानसभा मतदार संघातील संघटनात्मक सुपर वॉरीयर्स संवाद सभेप्रसंगी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बोलत होते. येणाऱ्या काळात तुमच्या मधीलच कोणीतरी सरपंच, नगरसेवक, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य झालेले मला बघायचे असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे  यांनी  पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा ऑनलाईन अहवाल दाखवत चांगल्या कामाचे कौतुक करून काम न करणाऱ्या वॉरीयर्सला बदलून टाकण्याच्या सूचना देखील केल्या.   कोरोना काळात सुरेश निकम यांनी जिल्ह

प्रकाशदूत

Image
९ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या संशयीतास फाशीची शिक्षा द्या प्रकाशदूत मालेगाव : तालुक्यातील पिंपळगाव (दा.) येथील ९ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या संशयीतास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मार्चा काढला. गेल्या आठवड्यात पिंपळगाव (दा.) येथील अल्पवयीन बालिकेवर गावातीलच शिवाजी तुळशिराम पवार या ५५ वर्षीय संशयीताने पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली होती. सदर संशयीतावर वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. या संशयीतावरील गुन्हा फास्ट टॅक न्यायालयात चालविण्यात यावा व त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शनिवारी (दि.२५) रोजी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला. येथील एकात्मता चौकातून या आक्रोश मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी मोर्चाकांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी हामोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या नंतर या ठिकाणी मोर्चेकऱ्यांची भाषणे झाली. संशयीतास फाशीची शिक्षा न झाल्यास आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला, यावेळी अपर जिल्हाधिकारी का

प्रकाशदूत

Image

प्रकाशदूत

Image
चिराई ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा   प्रकाशदूत नामपूर : चिराई (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायतीत खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे खंदे समर्थक डॉ. शेषराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलच्या सरपंचासह सर्व नऊ जागेवरील उमेदवार विजयी झाले आहेत.  ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला. अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण बागलाण तालुक्याचे लक्ष लागले होते. थेट सरपंच पदासाठी डॉ. शेषराव पाटील यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतला आनंदराव पाटील यांना (८५०), तर विमलबाई साहेबराव अहिरे यांना (४०२) मते पडली. गावातील तीनही वार्ड मधील नऊ जागेवर प्रगती पॅनलचेच उमेदवार विजयी झाले आहेत.  गावाने सलग वीस वर्षापासून माझ्या वरती जो विश्वास ठेवला त्या बद्दल आगामी काळात सुध्दा गावाच्या सर्वागीण हितासाठी कटीबद्ध राहू अशी प्रतिक्रिया पॅनल प्रमुख डॉ. शेषराव पाटील यांनी व्यक्त केली. सलग पंधरा वर्षापासून  डॉ. शेषराव पाटील हे सरपंच आहेत. आता त्यांच्या मातोश्री सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून गावाचा व