प्रकाशदूत

९ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या संशयीतास फाशीची शिक्षा द्या

प्रकाशदूत
मालेगाव : तालुक्यातील पिंपळगाव (दा.) येथील ९ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या संशयीतास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मार्चा काढला.

Published from Blogger Prime Android App

गेल्या आठवड्यात पिंपळगाव (दा.) येथील अल्पवयीन बालिकेवर गावातीलच शिवाजी तुळशिराम पवार या ५५ वर्षीय संशयीताने पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली होती. सदर संशयीतावर वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. या संशयीतावरील गुन्हा फास्ट टॅक न्यायालयात चालविण्यात यावा व त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शनिवारी (दि.२५) रोजी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला. येथील एकात्मता चौकातून या आक्रोश मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी मोर्चाकांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी हामोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या नंतर या ठिकाणी मोर्चेकऱ्यांची भाषणे झाली. संशयीतास फाशीची शिक्षा न झाल्यास आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला, यावेळी अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तुप्ते यांनी निवेदन देण्यात आले. या आक्रोश मोर्चात पुरुषांबरोबरच महिलांची लाक्षणिय उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत