प्रकाशदूत

सुपर वॉरियर्सांची मेहनत आता पक्षासाठी नसून देशासाठी : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  

प्रकाशदूत
मालेगाव : सुपर वॉरियर्स म्हणजे जिल्ह्यातील प्रमुख योद्धे आहेत. आपण करीत असलेली मेहनत आता पक्षासाठी नसून देशासाठी आहे. सुपर वॉरीयर्सने किमान तीन तास २०२४ पर्यंत पक्षाला दिल्यास आपण ३४० पेक्षा जास्त खासदार लोकसभेत नक्कीच निवडून देऊ शकतो असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Published from Blogger Prime Android App

महाविजय संकल्प २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद अभियानांतर्गत येथील भाजप मालेगाव जिल्हा अंतर्गत असलेल्या मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य व बागलाण विधानसभा अशा तीन विधानसभा मतदार संघातील संघटनात्मक सुपर वॉरीयर्स संवाद सभेप्रसंगी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बोलत होते.

Published from Blogger Prime Android App

येणाऱ्या काळात तुमच्या मधीलच कोणीतरी सरपंच, नगरसेवक, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य झालेले मला बघायचे असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा ऑनलाईन अहवाल दाखवत चांगल्या कामाचे कौतुक करून काम न करणाऱ्या वॉरीयर्सला बदलून टाकण्याच्या सूचना देखील केल्या. कोरोना काळात सुरेश निकम यांनी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा अतिशय चोख सांभाळली. आता नव्याने नियुक्त झालेले जिल्हाध्यक्ष कचवे हे सर्वांना सोबत घेऊन धडाडीने काम करत असून आजी, माजी जिल्हाध्यक्षांचे कौतुक ही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले. खा. डॉ. भामरे म्हणाले, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपण विकास कामे करु शकलो वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या सूचनांचे पालन वॉरीअर्सने करावे. जो कार्यकर्ता वरिष्ठांच्या सुचनांचे पालन करतो. तो नक्की यशस्वी होत असतो असे ही ते म्हणाले. प्रत्येक विधानसभा सुपर वॉरीयर्सचे काम उल्लेखनीय आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सारखे सारथ्य पक्षाला मिळाल्यामुळे केंद्रात मोदीजी व राज्यात देवेंद्रजी यांना बसल्यावशिवाय आम्ही स्वस्त बसणार नसल्याचे प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बावनकुळे यांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. या प्रसंगी महामंत्री विजय चौधरी, धनराज विसपुते, प्रतापराव दिघावकर, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, दादा जाधव, देवा पाटील यांच्यासह प्रदेश पदाधिकारी, विधानसभा निवडणूक प्रमुख, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी, आघाड्या, प्रकोष्ठ, सर्व सेल व सुपर वॉरियर्स मोठया संख्येने उपस्थितीत होते. पुष्पलता पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर जिल्हा सरचिटणीस कमलेश निकम यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत