प्रकाशदूत

शेततळ्यात बुडून दोघा सख्या भावांचा मृत्यू

देवळा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

प्रकाशदूत
दाभाडी : देवळा तालुक्यातील बुटेश्वर शिवारात आज बुधवारी (दि.२०) संध्याकाळच्या सुमारास तेजस (१२) व मानव आहेर (६) वर्ष या दोघा सख्या भावांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली.

Published from Blogger Prime Android App

खामखेडा गावातील बुटेश्वर शिवारातील डोंगराला लागून असलेल्या शेतात गणेश संतोष आहेर हे राहतात. त्यांची दोन्ही मुलं तेजस व मानव आहेर हे आज दुपारच्या सुमारास शाळेतून घरी परत आले. त्यांच्या शेतात उन्हाळ कांदा काढणी सुरू असल्याने ते दोन्ही भाऊ आई वडिलांना मदत करण्यासाठी शेतात होते. दुपारच्या वेळी येथे जवळच्या डोंगरावरुन काही वानरांची टोळी शेतात आली असता त्यांना हुसकावण्याच्या नादात दोन्ही भाऊ त्यांच्या मागे धावले. वानरांना हुसकून आल्यानंतर जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यात पाणी पाहायला गेले असता मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी लहान भाऊ मानव याने हात दिला. मात्र तोही शेततळ्यात घसरला. त्यांच्या सोबत असलेल्या चार वर्षीय बहिनेने शेतात पळत येऊन काकांना हि घटना सांगितली. शेतात कांदे काढणी करत असलेले केदा आहेर व इतरांनी शेततळ्याकडे धाव घेतली. शेततळे अर्धे भरले होते.  शेजारील शेतकरी हरेश शेवाळे यांनी शेततळ्यातून दोघा मुलांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत दोघांचाही बुडून मृत्यु झाला होता. त्यांना देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयत तेजस हा खामखेडा येथील जनता विद्यालयात इयत्ता सहावीत तर व मानव  हा जिल्हा परिषद शाळा थळवस्ती येथे इयत्ता दुसरीत होता. गणेश आहेर यांच्या दोन्ही मुलांच्या अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत