प्रकाशदूत

मालेगावी मंगल कार्यालयात शिरलेल्या बिबट्या जेरबंद

प्रकाशदूत
मालेगाव : मालेगाव-नामपूर रस्त्यावरील मंगल कार्यालयात शिरलेल्या बिबट्याला दोन तासांच्या परिश्रमांनंतर जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. ही घटना मंगळवारी (दि. ५) सकाळी ७ च्या सुमारास घडली. भर वस्तीत बिबट्या आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा विवट्या पाण्याच्या शोधात आला असावा असा कयास जमलेल्या गर्दीतून लावण्यात येत होता.

Published from Blogger Prime Android App

शहरातील मालेगाव - नामपूर रस्त्यावर साई सेलिब्रेशन हॉल आहे. त्याला लागूनच कार्यालय व इतर गाळे आहेत. याच कार्यालयातील रखवालदार विजय अहिर यांचा मुलगा मोहित अहिरे (१३) हा कार्यालयात मोबाइल पाहात बसलेला होता. सकाळची वेळ असल्याने सर्व गाळे बंद होते. फक्त कार्यालयच उघडे होते. अचानक बिबट्या डरकाळ्या फोडत मोहितच्या जवळून कार्यालयात आत शिरला. मोहितने त्याला मध्ये जाऊ देत न घाबरता हळूच उठून धिटाईने दरवाजा बंद करत कार्यालयाबाहेर धूम ठोकली. त्यानंतर त्याने वडिलांना बिबट्या कार्यालयात कोंडल्याची माहिती दिली. त्यांनी कार्यालयाच्या संचालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी वनविभागाला कळविले. 

Published from Blogger Prime Android App

नाशिक येथील रेस्क्यू पथकालाही यासंदर्भात माहिती देण्यात आली. कार्यालयात बिबट्या कोंडल्याची माहिती मिळताच बघ्यांनी गर्दी केली होती. यावेळी मालेगाव वनविभाग व महापालिकेच्या अग्निशमनदलासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी गर्दी पांगवत परिसर मोकळा केला. त्यानंतर १०.३० च्या सुमारास नाशिक येथील रेस्क्यू पथक पोहोचले. या पथकातील डॉ. मनोहर नागरे, वैभव उगले यांच्यासह मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे, अग्निशमन दलाचे संजय पवार यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी बिबट्या असलेल्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर कार्यालयातील बंद असलेल्या दरवाजाबाहेर पिंजरा असलेल वाहन उभे करण्यात आले. यावेळी कार्यालयातील उघड्या खिडकीतून बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देत बेशुद्ध केले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेशुद्ध असलेल्य बिबट्याला उचलून पिंजऱ्यामध्ये सुरक्षितरीत्या जेरबंद केले. हा बिबट्या साधारण ३ ते ४ वर्षांचा नर जातीचा आहे. मोहितमुळे विवट्या जेरबं झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेच निःश्वास सोडला.

Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत