प्रकाशदूत

विहिरीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या  माय लेकींचा विहिरीत पडून मृत्यू  ; झोडगे येथील घटना

प्रकाशदूत
दाभाडी : 
तालुक्यातील झोडगे येथे गावाजवळ असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या माय लेकीचा गुरुवारी (दि.4) रोजी विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. निताबाई जाधव (वय 47) व इच्छामणी जाधव (वय 16) असे मृत्यूमुखी पडलेल्या माय लेकीचे नावे आहेत. गेल्या वर्षीच निताबाई यांचे पती बाळू जाधव यांचे निधन झाले आहे. पती पाठोपाठ वर्षानंतर पत्नी व मुलीचा ही मृत्यू झाल्याने जाधव परिवारावर दु;खाचा डोंगर कोसळा असून या दु;खद घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published from Blogger Prime Android App

माळमाथा भागासह झोडगे परिसरात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. झोडगेसह परिसरात सद्या वीस दिवसानंतर गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते. शेत शिवारातील अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. ज्या काही विहिरंना थोडेफार पाणी उपलब्ध आहे. अशा ठिकाणी गावातील महिला कपडे धुण्यासाठी व पाण्यासाठी विहिरींवर जातात. तर पशुपालक शेत शिवारातील विहिरींवर जाऊन जनावरांची तहान भागवत आहेत.

Published from Blogger Prime Android App

गावातील निताबाई व त्यांची मुलगी ईच्छामणी या गुरुवारी दुपारच्यावेळी गावा शेजारी   डोंगराजवळ असलेल्या विहिरीवर कपडे धुणे धुण्यासाठी व पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. या विहिरीत साधारणता. 30 ते 40 फुट पाणी साचवलेले होते. या ठिकाणी दोर बादलीच्या सहाय्याने विहिरीतून पाणी काढत असताना त्यांचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. सायंकाळच्या सुमारास शेळ्या-मेंढ्या चारणारे पशुपालक घराकडे येत असताना त्यांना विहिरीत बुडालेल्या मायलेकी दिसल्या. या घटनेची माहिती त्यांनी गावात देताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस नाईक सतीश मोरे, पोलीस शिपाई मयूर भावसार, राऊत तसेच तलाठी सुधीर कदम आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. विहिरीत पडलेल्या मायलेकींना बाहेर काढत शवविच्छेदनासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठवले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करुन त्याना मृत्यू घोषित केले. रात्री उशिरा त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. निताबाई या येथील कोतवाल शिवाजी जाधव यांच्या आई तर ईच्छामणी बहिण होत.  

Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत