प्रकाशदूत

मालेगावच्या महिलेची बसमध्येच झाली प्रसुती

प्रकाशदूत । विनोद पाटणी
उमराणे : नाशिक येथून मालेगावसाठी निघालेल्या गर्भवती महिलेने उमराणे गावाजवळील राहुड घाटाजवळ नाशिक मालेगाव बसमध्येच गोंडस मुलाला जन्म दिला असून बाळ, बाळांतीण सुखरूप आहेत.

Published from Blogger Prime Android App

मालेगाव येथील आयेशा नगर भागात राहणाऱ्या नाझमी शेख या नऊ महिन्याच्या गर्भवती होत्या. काल गुरुवारी (दि.१) जून रोजी नाशिक येथे द्वारकेजवळ राहणाऱ्या त्यांच्या आई झाकीरा खान यांचे निधन झाले होते. त्यासाठी त्या पती आबीद शेख यांच्या समावेत अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या.

Published from Blogger Prime Android App

शुक्रवारी (दि.२) पहाटे त्यांना त्रास सुरू झाला म्हणून ठक्कर बाजार जवळ असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना सकाळी सात वाजता ऍडमिट केले होते. प्रसव वेदना जास्त होत होत्या. वेळोवेळी त्यांनी संबंधित डॉक्टरांना याबद्दल सांगितले. परंतू दुपारी एक वाजून गेला तरी सिव्हिल मधील डॉक्टरांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. प्रसूती होण्यास दोन दिवस लागतील असे त्यांना सांगितल्यामुळे वैतागून त्यांच्या परिवाराने मालेगावी जाण्याचा निर्णय घेतला. 

Published from Blogger Prime Android App

दुपारी दोन वाजता त्या मालेगाव नासिक बसने पती आबीद शेख सह मालेगाव येण्यासाठी निघाले. राहूड घाटात गतिरोधकावर (स्पीड ब्रेकर) बस आदळल्याने त्यांना जास्त त्रास होऊ लागला. राहूड घाट उतरल्यानंतर बस मध्येच त्यांची प्रसुती झाली. यावेळी वाहक सुरेखा वाघ यांनी तत्परता दाखवून प्रसुती केली. चालक विजय नेरकर यांनी समय सूचकता दाखवून तात्काळ बस सौंदाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेली. 

Published from Blogger Prime Android App

वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय ततार, डॉ. ऐश्वर्या पणपालीया, डॉ. राकेश पवार, डॉ. राजेश सावंत, सुरेखा देवरे, आरोग्य सेविका लीला आहेर, उमेश ठोके आदी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ वैद्यकीय मदत केली. बाळ सुखरूप असून आबिद शेख यांनी बस वाहक व चालक यांनी मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. परंतू नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटल मध्ये मिळालेल्या वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

Published from Blogger Prime Android App

Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत